Our Heritage, Your Kitchen
Preserving the authentic flavors of Maharashtra for three generations.
अपूर्वा मसाले... नाव मसाल्याचं, पण नातं मातीशी.
आपल्या गावाकडच्या घरात पहाटेची लगबग सुरू झाली की चुलीवरच्या फोडणीचा खमंग दरवळ घरभर पसरायचा. जात्यावर दळलेल्या मसाल्याचा सुगंध, आईच्या हातची चव आणि स्वयंपाकघरात जपलेल्या जुन्या पाककृती... या सगळ्यांतच आपल्या मातीची खरी श्रीमंती दडलेली आहे.
अपूर्वा मसाल्यांचा जन्मही अशाच एका घरगुती परंपरेतून झाला.
अपूर्वा आणि त्यांचे बंधू निलेश ठाकूर यांनी पहिल्यांदा तयार केलेला मसाला त्यांच्या मातोश्री स्व. कल्पना कमळाकर ठाकूर यांच्या जुन्या डायरीतील पाककृतीवरून तयार केला. अनेक वर्षे त्या अगदी ठरावीक प्रमाणात मसाला बनवत असत. हाताला चव होती, स्वयंपाकाची जाण होती आणि प्रत्येक पदार्थात मायेची फोडणी घालण्याची त्यांची हातोटी होती. त्या खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा आणि उत्तम सुगरण होत्या. त्यांच्या हातचा मसाला म्हणजे केवळ काही मसाल्यांचं मिश्रण नव्हतं; त्यात घराची चव होती, मायेची ऊब होती आणि आपल्या मातीतल्या स्वयंपाकाची परंपरा होती.
आईने जपलेला हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा, हे स्वप्न अपूर्वा आणि निलेश यांनी पाहिलं. दोघांनी मिळून या वारशाला नवी ओळख देण्याचा ध्यास घेतला. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. निलेश यांची साथ या प्रवासात अर्ध्यावरच सुटली. पण स्वप्न थांबले नाही...
आठवणी थांबल्या नाहीत...
आणि आईचा वारसाही थांबला नाही.
अपूर्वांनी जिद्दीने हा वारसा पुढे नेण्याचा निर्धार केला. आईच्या डायरीतली ती चव, भावाचं स्वप्न आणि आपल्या घराघरातल्या पारंपरिक स्वयंपाकाची ओढ मनाशी धरून अपूर्वा मसाले आजही आपला प्रवास सुरू ठेवत आहेत.
या प्रवासात आता श्री. आनंद ठाकूर यांची खंबीर साथ लाभली आहे. नोकरी सोडून त्यांनी स्वतःला पूर्णवेळ या कामासाठी वाहून घेतले आहे. स्वयंपाकाची उत्तम जाण आणि पारंपरिक पद्धतींचे ज्ञान असल्यामुळे मसाले तयार करताना आजी-आईच्या काळापासून चालत आलेली घरगुती पद्धत, योग्य प्रमाण आणि अस्सल चव यांना विशेष महत्त्व दिले जाते. कारण आमच्यासाठी मसाला तयार करणं म्हणजे फक्त पदार्थांची भुकटी करणं नाही...
ती एक परंपरा आहे.
ती एक आठवण आहे.
तो आपल्या मातीचा दरवळ आहे.
आपल्या प्रत्येक घरात एक मसाल्याचा डबा असतो. छोटासा दिसणारा हा डबा खरं तर संपूर्ण स्वयंपाकघराचा जीव असतो. त्यातल्या प्रत्येक डबीत घरची चव, आईच्या हातची आठवण आणि पिढ्यान्पिढ्या जपलेलं एक गुपित दडलेलं असतं. पदार्थाला खुलवणारा रंग, जिभेवर रेंगाळणारी चव आणि घरभर दरवळणारा सुगंध—हे सगळं येतं ते मसाल्याच्या योग्य प्रमाणातून.
हेच प्रमाण...
हीच चव...
आणि हाच घरगुती सुगंध...
अपूर्वा मसाल्यांनी जपला आहे.
शुद्ध, स्वादिष्ट आणि आरोग्यदायी मसाले तयार करून आपल्या घराघरातल्या चुलीपर्यंत पोहोचवणं, आपल्या मातीतली अस्सल चव पुढच्या पिढीपर्यंत नेणं आणि बदलत्या काळातही आपल्या खाद्यपरंपरेची मुळं घट्ट धरून ठेवणं—हीच अपूर्वा मसाल्यांची वाटचाल आहे.
चुलीपासून सुरू झालेली चवीची ही गोष्ट,
आज तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचते आहे.
अपूर्वा मसाले
मातीचा सुगंध... घरची चव... परंपरेचा वारसा.
Our Mission
To bring the purest, unadulterated Maharashtrian spices to every household, ensuring health and flavor go hand in hand without compromise.
Our Vision
To become the global ambassador of authentic Indian culinary heritage, making the rich, complex flavors of Maharashtra celebrated worldwide.